🕒 1 min read
नवी दिल्ली : वेलिंग्टन कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद करणारा इशांत शर्मा दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही. सरावादरम्यान इशांतच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागेवर उमेश यादवला संधी देण्यात आली. मात्र इशांच्या या दुखापतीमुळे, तो आयपीएलच्या आगामी हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होत आहे. मात्र त्याआधीच बऱ्याच खेळाडूंनी दुखापतीमुळे माघार घेतली आहे. इशांत शर्माही आयपीएलमधील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नसल्याने दिल्ली संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला मोठा धक्का बसला आहे.
इशांतच्या दुखापतीमुळे बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी यांच्यात वाद झाला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) मुख्य फिजिओ आशिष कौशिक या वादात अडकले आहे. दुखापतीमुळे इशांत शर्माला पुन्हा एकदा एनसीएला जावे लागणार आहे.
इशांत शर्मा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाकडून शर्मानं 13 सामन्यात 13 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळं दिल्ली संघासाठी हा मोठा धोका असणार आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

