मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ५८वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) यांच्यात होत आहे. मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात दिल्लीचा कप्तान ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स ११ पैकी ७ सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स ११ पैकी ५ सामने जिंकून पाचव्या स्थानावर आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
सलग दोन सामने गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून विजयी मार्गावर परतला. शिमरॉन हेटमायरने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याने या हंगामात फिनिशर म्हणून आपल्या संघासाठी जबरदस्त खेळ केला. मात्र त्याच्या मुलाच्या जन्मामुळे तो घरी परतला. फलंदाजीत संजू सॅमसनला बेजबाबदार फटके खेळून आपली विकेट फेकणे टाळावे लागणार आहे. संघाला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी सुधारण्याची गरज आहे.
A look at the Playing XI for #RRvDC
Live – https://t.co/EA3RTz0tWQ #RRvDC #TATAIPL https://t.co/urbjTtm6xL pic.twitter.com/0K0k8rO07v
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2022
दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागला. संघाची फलंदाजी डेव्हिड वॉर्नरवर अवलंबून असल्याचे दिसते. कर्णधार ऋषभ पंतला चांगल्या सुरुवातीनंतर मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. गोलंदाजीत शार्दुल ठाकूरनेही आपली लय गमावली आहे. खलील अहमद संघासाठी जबरदस्त गोलंदाजी करत आहे.
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन(यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, रासी व्हॅन डर ड्युसेन, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कप्तान), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, चेतन साकारिया, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

