Share

IPL 2022 : पहिल्याच प्रयत्नात गुजरातची प्लेऑफमध्ये एन्ट्री! हार्दिक म्हणतो, “मला संघातील सर्वांचा…”

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या ५८व्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ६२ धावांनी पराभव केला. यासह गुजरात टायटन्स हा आयपीएल २०२२च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने आपल्या संघांबाबत मत दिले. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात १४४/४ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपरजायंट्सचा संघ १३.५ षटकांत ८२ धावांवर ऑलआऊट झाला.

सामना संपल्यानंतर हार्दिक म्हणाला, ”मला संघातील सर्वांचा अभिमान आहे. जेव्हा आम्ही हा प्रवास एकत्र सुरू केला तेव्हा आमचा स्वतःवर विश्वास होता, पण १४व्या सामन्यापूर्वी आम्ही पात्र ठरलो. हा एक चांगला प्रयत्न आहे आणि आम्हाला स्वतःचा अभिमान आहे. आम्ही जे काही सामने जिंकले त्यात आम्ही नेहमीच दडपणाखाली होतो. शेवटचा सामना हा एकमेव सामना होता जिथे आम्ही सामन्यात पुढे होतो आणि आम्हाला माहीत होते की आमच्याकडे ज्या प्रकारचे फलंदाज आहेत, ते सामना संपवतील. पण तसे झाले नाही. याबाबत गटात चर्चा सुरू होती.”

असा रंगला सामना…

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पदार्पणाचा आयपीएल हंगाम खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने धमाका केला आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील स्पर्धेच्या ५७व्या सामन्यात (LSG vs GT) लखनऊ सुपर जायंट्सचा सुपडा साफ करत गुजरात प्लेऑफसाठी पात्र होणारा पहिला संघ ठरला आहे. स्पर्धेत सलग होणाऱ्या सामन्यांमुळे संथ होत चाललेल्या खेळपट्टीचा अंदाज घेत हार्दिकने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने लखनऊला १४५ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात राशिद खानचे ४ बळी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेल्या साथीमुळे गुजरातने लखनऊचा डाव फक्त ८२ धावांवर संपुष्टात आणला आणि ६२ धावांनी विजय नावावर केला. या विजयासह गुजरात १८ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!