Share

IPL 2022 : कोण आला रे कोण आला…राजस्थानचा ‘वाघ’ आला! कॅप्टन सॅमसनसाठी खूशखबर; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सने चमकदार कामगिरी केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केल्यानंतर, राजस्थान १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे आणि प्लेऑफच्या उंबरठ्यावर उभा आहे. राजस्थानला आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी २० मे रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी हा स्फोटक फलंदाज राजस्थान संघात परतला आहे. जो राजस्थानसाठी मोठा दिलासा आहे.

शिमरॉन हेटमायर पहिल्या मुलाच्या जन्मामुळे गयानामधील त्याच्या घरी परतला होता. आता मुलाच्या जन्मानंतर, तो संघात सामील झाला आहे आणि त्याने त्याचा क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. हेटमायर सीएसकेविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात राजस्थान जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हेटमायर मायदेशी रवाना झाला. त्याने १६ चेंडूत ३१ धावा केल्या. त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या मुलाची झलक चाहत्यांना दाखवली होती.

आयपीएलच्या या मोसमातील हेटमायरच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, त्याने ११ सामन्यांमध्ये ७०च्या सरासरीने आणि १६०च्या स्ट्राइक रेटने २९१ धावा केल्या. तो ७ सामन्यात नाबाद राहिला. राजस्थानला शुक्रवारी त्याला विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यांचे १६ गुण झाले आहेत. त्याचवेळी लखनऊ १६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!