Share

Womens T20 Challenge : मोठी बातमी..! महिला आयपीएलसाठी तीन संघांची घोषणा; ‘या’ तिघींना बनवलं कॅप्टन!

Published On: 

मुंबई : बीसीसीआयने (BCCI) आज महिला टी-२० चॅलेंज २०२२ (Womens T20 Challenge) स्पर्धेसाठी संघांची घोषणा केली आहे, ही महिला आयपीएलच्या धर्तीवर खेळवली जाणारी स्पर्धा आहे. हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा यांची तिन्ही संघांच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. २३ मे रोजी सकाळी साडेसातवाजता स्पर्धेला सुरुवात होईल. ट्रेल ब्लेझर्स आणि सुपरनोव्हाज पहिल्या सामन्यात आमनेसामने असतील.

सुपरनोव्हाजचे नेतृत्व हरमप्रीत, ट्रेलब्लेझर्सचे स्मृती करेल. तर तिसरा संघ वेलोसिटीचे नेतृत्व यावेळी दीप्ती शर्मा करणार आहे. महिला आयपीएलबद्दल सर्व गोष्टींबद्दल उत्सुकता होती आणि प्रत्येकजण वाट पाहत होता, ही स्पर्धा आयपीएलच्या शेवटच्या टप्प्याच्या मध्यभागी होणार आहे, त्याला किती प्रेक्षक मिळतात हे पाहणे मनोरंजक असेल.

बीसीसीआयने महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सरच्या नावाची घोषणा केली आहे. फॅन्टसी लीग वेबसाइट My11Circle ला टायटल स्पॉन्सर बनवण्यात आले आहे. यंदाच्या मोसमात महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचे आयोजन २४ ते २८ मे दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासह एकूण १२ परदेशी खेळाडू महिला टी-२० चॅलेंजचा भाग असतील.

संघ –

सुपरनोव्हाज – हरमनप्रीत कौर (कप्तान), तानिया भाटिया, ऍलेना किंग, आयुषी सोनी, चंदू व्ही, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंग, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकार, प्रिया पुनिया, राशी कनोजिया, सोफी एक्लेस्टोन, सून लुस, मानसी जोशी.

ट्रेलब्लेझर्स – स्मृती मंधना (कप्तान), पूनम यादव, अरुंधती रेड्डी, हेली मॅथ्यूज, जेमिमाह रॉड्रिग्ज, प्रियांका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, रिचा घोष, एस मेघना, सायका इशाक, सलमा खातून, शर्मीन अख्तर, सोफिया ब्राऊन, सुजाता मलिक, एसबी पोखरकर.

वेलोसिटी – दीप्ती शर्मा (कप्तान), स्नेह राणा, शफाली वर्मा, अयाबोंगा खाका, केपी नवगिरे, कॅथरीन क्रॉस, कीर्ती जेम्स, लॉरा वोल्वार्ड, माया सोनवणे, नत्थकन चंटम, राधा यादव, आरती केदार, शिवाली शिंदे, सिमरन बहादूर, यस्तिका भाटिया, प्रणवी चंद्रा.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!