Share

IPL 2022: पंजाबच्या भानुका राजपक्षेने सांगितले निवृत्ती घेण्याचे कारण ; श्रीलंका बोर्डसंबंधी मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: IPL 2022 मध्ये बॅटने धुमाकूळ घालणारा पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज भानुका राजपक्षे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर त्याने परतण्याचा विचार का केला होता याचा त्याने नुकताच खुलासा केला आहे. भानुका राजपक्षे पंजाबच्या सामन्यानंतर त्याने यासंबंधी वक्तव्य केले आहे.

शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात KKRविरुद्धच्या पराभवानंतर आभासी पत्रकार परिषदेत त्याच्या निवृत्तीबद्दल विचारले असता, भानुका राजपक्षे (Bhanuka rajpakshe) म्हणाला, “मला माझी निवृत्ती मागे घ्यावी लागली कारण श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मला तसे करण्यास सांगितले होते. मी आता देशासाठी अधिक खेळू शकतो. मला स्किनफोल्डची समस्या होती आणि त्यामुळे मी श्रीलंकेसाठी खेळू शकलो नाही आणि बोर्डाच्या मानकांची पूर्तता करू शकलो नाही. मी माझ्या खेळावर थोडे काम केले आहे. आयपीएल येण्यापूर्वी मी जवळपास चार महिने क्रिकेट खेळले नव्हते. मला इथे येऊन समाधान द्यायचे होते. मी माझ्या क्रिकेटचा आनंद घेत आहे.”

भानुकाने क्रिकेट बोर्डाच्या सांगण्यावरून आपला निर्णय बदलला होता आणि म्हणूनच निवृत्ती घेतल्यानंतर त्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भानुकाने जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी हा निर्णय घेतला. निवृत्तीची घोषणा करताना भानुका राजपक्षे यांनी यामागचे कारण कौटुंबिक कारण सांगितले होते. पण, निवृत्ती घेतल्यानंतर काही दिवसांनी त्याने आपला निर्णय बदलला आणि संघात परतला. त्याने सांगितले की त्याला अजूनही आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!