Share

IPL 2022 MI vs KKR : “माझा नवरा…”, जसप्रीत बुमराहच्या नेत्रदीपक कामगिरीवर बायको खूश; काय म्हणाली वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्सने विक्रमी पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सचा (MI vs KKR) ५२ धावांनी पराभव करून आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. आयपीएलच्या ५६व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दमदार गोलंदाजी केली. बुमराहने चालू हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने ५ विकेट आपल्या नावावर केला. ‘यॉर्कर’ स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुमराहने पहिल्या ३ षटकांमध्ये ५ विकेट घेतल्या, ज्यामध्ये एक षटक निर्धाव षटक देखील होते.

जसप्रीत बुमराहने आयपीएल तसेच टी-२० करिअरमध्ये पहिल्यांदाच ५ विकेट घेतल्या. त्याने चार षटकांत १० धावा देऊन ५ बळी घेतले. बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे केकेआरचा संघ २ बाद १२३ धावा केल्यानंतर २० षटकांत ९ बाद १६५ धावाच करू शकला. मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर बुमराहच्या नेत्रदीपक पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्स कॅम्प खूप आनंदी दिसत होता. बुमराहची पत्नी संजना गणेशनही पतीच्या कामगिरीची साक्षीदार बनली. स्टेडियममध्ये उपस्थित असलेली संजना खूपच आनंदी दिसत होती.

संजना गणेसन यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला. तिने ट्विटरवर तीन फायर इमोजीसह लिहिले, ‘माझा नवरा आग आहे.’ संजनाचे हे ट्वीट काही वेळातच व्हायरल झाले. पॉवरप्लेमध्ये बुमराहला एकही विकेट घेता आली नाही.

असा रंगला सामना…

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सला नवव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या लीगच्या ५६व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (MI vs KKR) चोख प्रत्युत्तर देत मुंबईला ५२ धावांनी मात दिली. या सामन्यात कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वल दर्जाची गोलंदाजी करत १० धावांत ५ बळी घेतले आणि कोलकाताला २० षटकात ९ बाद १६५ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात मुंबईकडून इशान किशन वगळता इतर सर्व फलंदाज पूर्णपणे ढेपाळले. कोलकाताने मुंबईला ११३ धावांवर ऑलआऊट केले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!