मुंबई: कृष्णा मराठवाडा प्रकल्पातील पाणी उपलब्धतेच्या प्रश्नावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत उत्तर दिले. सहा टिएमसी पिण्याचे पाणी या भागात उपलब्ध आहे. उर्वरित 16.66 टिएमसी पाणी कसे उपलब्ध होईल याचा अभ्यास जलसंपदा विभागाकडून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णा लवादातील पाणी बाहेर देण्याची परवानगी नाही. राज्य सरकारची या भागाला पाणी देण्याची इच्छा आहेच पण तांत्रिक गोष्टींचा अभ्यास सुरु आहे. त्यानुसार यावर नक्की मार्ग काढला जाईल, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत.
वळण बंधाऱ्यांचा वापर करून आपण नाशिक जिल्ह्यात पूर्वेचे पाणी पश्चिमेला आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या कामाला मोठी गती आली आहे. काही प्रकल्प जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे. राज्यात अशाप्रकारचे 14 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. भविष्यात 11 प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यातून मोठ्या प्रमाणात गोदावरी खोऱ्यात पाणी आणले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
कृष्णा मराठवाडा प्रकल्पातील पाणी उपलब्धतेच्या प्रश्नावर जलसंपदा मंत्री ना. @Jayant_R_Patil यांनी विधान परिषदेत उत्तर दिले. सहा टिएमसी पिण्याचे पाणी या भागात उपलब्ध आहे. उर्वरित 16.66 टिएमसी पाणी कसे उपलब्ध होईल याचा अभ्यास जलसंपदा विभागाकडून सुरु आहे.https://t.co/HNkV3Mh0E9
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 24, 2022
सोबतच विदर्भातील सिंचन अनुशेष भरून काढण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे यामध्ये राज्यपालांनी दिलेले निर्देश पाळून केलेल्या अनुशेष वाटपाचा अहवाल जयंत पाटील यांनी सभागृहात वाचून दाखवला. कोळकेवाडी धरणातील 67.5 टिएमसी पाणी वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीत सोडण्यात येते. यातील साडेसतरा टीएमसी पाणी वशिष्ठी खोऱ्यात सिंचनासाठी व चिपळूण शहरात पिण्यासाठी व औद्योगिकीकरणासाठी सोडले जाते. उर्वरीत पन्नास टिएमसी शिल्लक पाणी उत्तर कोकणाला मिळावे याचा प्रयत्न सुरु असून दक्षिण रायगड जिल्ह्यात विकसित होणारा भाग पाहता तिथपासून नवी मुंबईपर्यंत पाण्याची गरज आहे. यासाठी वॅपकॉस या कंपनीमार्फत काम सुरु आहे. वशिष्ठी नदीचे पाणी चिपळूणपासून वर उचलून आणणे व एमएमआर रिजनमध्ये पाण्याची व्यवस्था निर्माण करणे याचा अभ्यास सुरु असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- उद्योगमंत्री सुभाष देसाईंना औरंगाबाद खंडपीठाचा दणका; नेमके कारण काय?
- “धनंजय मुंडेंना स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं”, करुणा मुंडेंच्या ‘त्या’ आरोपांनंतर निलेश राणेंचा टोला
- आमच्या प्रेमकहाणीवरचे पुस्तक अंतिम टप्प्यात- करुणा मुंडे
- रवी शास्त्रीचें मोठे वक्तव्य; ‘विराटने कर्णधापद सोडणे इमानदारी…’
- RR आबांच्या पुत्राने मागणी करताच धनंजय मुंडेंची तातडीने नियोजन करण्याची सूचना

