Share

IPL 2022 : ‘तारीख पे तारीख’! अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाबाबत अजूनही प्रश्नचिन्हचं

Published On: 

मुंबई : आयपीएल (IPL 2022)चा हंगाम आता जवळपास संपत आला आहे. यंदाच्या हंगामातील साखळी फेरीतील फक्त तीनच सामने शिल्लक राहिले आहेत. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. या संघाने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र यंदाच्या हंगामात मुंबईला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मुंबईचं या हंगामातील आव्हान केव्हाच संपुष्टात आलं आहे. मुंबईने यंदाच्या हंगामात त्यांच्या १३ सामन्यांत फक्त तीनच सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबई संघ आयपीएल गुणतालिकेत तळाशी जाऊन बसलेला आहे.

मुंबईला त्यांचा शेवटचा सामना शनिवारी दिल्ली विरुद्ध खेळायचा आहे. त्यांच्या या शेवटच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी मिळेल का असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करत आहे.

अर्जुनला संधी मिळणार का?

अर्जुन तेंडुलकर मुंबई संघामध्ये २०२१ पासून आहे. मुंबईने अर्जुनला २०२१ मध्ये २० लाख रुपयात गोटात घेतलं होतं. तर यंदाच्या हंगामासाठी अर्जुन तेंडुलकर १० लाख रुपये वाढवून दिले. मुंबई फ्रँचायजीने अर्जुनसाठी या मोसमात ३० लाख रुपये मोजले. अर्जुन मुंबई संघात २ वर्षांपासून आहे. मात्र त्याला अजूनही पदार्पणाची संधी मिळालेली नाही. अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या १४व्या हंगामापासून ते आतापर्यंत एकूण २७ सामन्यांपासून पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र त्याला डेब्यूसाठी ‘तारीख पे तारीख’ मिळाली आहे.

मुंबईने या मोसमात प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी मिळणार की पुढील हंगामाची वाट पाहावी लागणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

महत्वाच्या बातम्या : 

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!