मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल चांगल्या फॉर्मात आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या (LSG vs RR) सामन्यात यशस्वीने मैदानाबाहेर षटकार ठोकला. राजस्थानच्या डावाच्या सहाव्या षटकात दुष्मंता चमिरा गोलंदाजी करत होता. या षटकात यशस्वीने स्टेडियमच्या बाहेर चेंडू मारला.
यशस्वीचा हा षटकार पाहून सर्वच स्तब्ध झाले. १०३ मीटरचा हा लांब षटकार होता. चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेल्यानंतर अंपायरला दुसरा चेंडू मागवावा लागला. आयपीएल २०२२मध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम पंजाब किंग्जचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनच्या नावावर आहे. लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शमीच्या चेंडूवर सर्वात लांब षटकार मारला. गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात लिव्हिंगस्टोनने ११७ मीटर लांब षटकार ठोकला. मुंबई इंडियन्सच्या डेवाल्ड ब्रेविसनेही या मोसमात ११२ मीटरचा षटकार मारला आहे.
https://twitter.com/MohitKu38157375/status/1525880854287110144?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1525880854287110144%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fsports%2Fipl%2Fyashasvi-jaiswal-smashed-103-meter-six-ball-lands-out-of-brabourne-stadium-ipl-2022%2F1185888
आयपीएल २०२२ मध्ये चाहत्यांना भरपूर षटकार मिळत आहेत. आयपीएलचा हा मोसम आता या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा मोसम बनला आहे. या हंगामापूर्वी एका स्पर्धेत ८७२ षटकार मारण्याचा विक्रम होता, मात्र यावेळी हा आकडा ओलांडला गेला असून सामने अद्याप बाकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

