मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघ पुन्हा विजयी मार्गावर परतला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने राजस्थान रॉयल्सचा (KKR vs RR) सात गडी राखून पराभव केला. या विजयानंतर, दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता पंजाब संघाला मागे टाकून गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. डावखुरा फलंदाज रिंकू सिंहने कोलकाताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या सामन्यात रिंकूने कोलकाता कोलकाताकडून २३ चेंडूत ४२ धावा केल्या. रिंकूने २०१८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, या पाच वर्षांत रिंकूला नियमित संधी मिळाली नाही. त्यामुळे संधी मिळताच रिंकूने सोने केले. त्याने या सामन्यात सहा चौकार आणि एक षटकार मारून सामनावीराचा पुरस्कार पटकावला. रिंकूला सामन्याच्या आदल्या रात्री वाटत होते, की तो मंगळवारी काहीतरी धमाका करेल.
सामन्यानंतर राणासोबत झालेल्या संभाषणात रिंकूने सांगितले, की झोपण्यापूर्वी त्याने हातावर ‘५० रन्स नॉट आऊट…’ असे लिहिले होते. रिंकू म्हणाला, ”मला वाटत होते की आज मी धावा करेन, सामनावीर ठरेन आणि मी स्वतः माझ्या हाताने ५० लिहिलं होतं.” केकेआरने त्यांच्या ट्विटर हँडलवर रिंकू आणि नितीशचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात रिंकू म्हणतो, ”आतून फिलींग येत होत्या. खूप दिवसांपासून या गोष्टीची वाट पाहत होतो… सामनावीर कधी मिळणार… चांगली खेळी ५ वर्षानंतर आली.”
Said it. Did it. ????@rinkusingh235 #KKRHaiTaiyaar #KKRvRR #IPL2022 pic.twitter.com/3q3xgyoIOC
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 2, 2022
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना रॉयल्सने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताची सुरुवात खराब झाली. आरोन फिंच (४) आणि बाबा इंद्रजीथ (१५) चांगले सलामी देऊ शकले नाहीत. कर्णधार श्रेयस अय्यर आणि राणा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. अय्यरने ३२ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

