Share

काय सांगता..! द्रविड असताना टीम इंडियाला मिळणार ‘नवा’ कोच; ‘या’ दिग्गजाकडे देणार जबाबदारी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० घरच्या मालिकेसाठी आणि आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा (team india) प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या संघांची निवड करू शकते. राहुल द्रविड कसोटी संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, तर व्हीव्हीएस लक्ष्मण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत प्रशिक्षकाची भूमिका बजावू शकतो.

बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले, ”आम्ही आता २४ जून रोजी बर्मिंगहॅम कसोटीपूर्वी लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. राहुल द्रविड १५ किंवा १६ जूनला संघासोबत रवाना होणार आहे. आम्ही लक्ष्मणला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका आणि आयर्लंड विरुद्ध टी-२० मालिकेत उपस्थित राहण्यास सांगू.”

अनुभवी रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्रांती दिली जाऊ शकते. हे सर्व खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहेत. देशांतर्गत टी-२० मालिकेत सलामीवीर ऋतुराज गायकवाड, इशान किशन, वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि जितेश शर्मा यांना संधी मिळू शकते. उमरान आणि जितेश आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी करत आहेत. भारतीय संघ ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!