Share

IPL 2022 DC vs KKR : नको भावा..! ‘नो बॉल कॉन्ट्रोवर्सी’ दरम्यान चहलनं कुलदीपला पॅव्हेलियनमध्ये जाण्यापासून रोखलं; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs KKR) यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या ३४व्या सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू पंचांनी नो बॉल म्हणून घोषित केला नाही, त्यानंतर डगआऊटमध्ये बसलेला दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत चिडला आणि त्याने क्रिजवर उपस्थित असलेले आपले फलंदाज रोवमन पॉवेल आणि कुलदीप यादव यांना परत येण्यासाठी इशारा केला.

कुलदीप कर्णधाराच्या सांगण्यावरून परतत असताना राजस्थानचा गोलंदाज युझवेंद्र चहलने त्याला तसे करण्यापासून रोखण्यास सुरुवात केली. युझवेंद्र कुलदीपला त्याच्या नॉन स्ट्राइक एंडला जाण्यासाठी दबाव टाकत होता. फलंदाज माघारी परतल्यानंतर प्रकरण आणखी चिघळले असते, हे चहलला माहीत होते. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नक्की घडलं काय?

दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या षटकात ३६ धावांची गरज होती. पॉवेलने ओबेड मॅकॉयच्या पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. अशाप्रकारे दिल्लीला शेवटच्या तीन चेंडूत १८ धावांची गरज होती. अशा स्थितीत नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या कुलदीपने अंपायरकडे बोट दाखवून शेवटच्या चेंडूचा रिप्ले पाहण्यास सांगितले कारण तो कमरेच्या वर असता तर तो नो-बॉल होऊ शकला असता. पॉवेलनेही पंचांशी बोलण्यास सुरुवात केली पण मैदानावरील पंचांनी चेंडू वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर पंतने पॉवेल आणि कुलदीपला परतण्यास सांगितले. दरम्यान, सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने त्याच्याशी संवाद साधला.

या घटनेदरम्यान दिल्लीच्या कोचिंग स्टाफचे सदस्य प्रवीण अमरेही मैदानात आले, मात्र पंचांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. राजस्थानचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने कुलदीपला बाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. राजस्थानचा सलामीवीर आणि सामन्यात ११८ धावा करणारा जोस बटलरही पंतशी सीमारेषेजवळ वाद घालताना दिसला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!