🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मॅरेथॉन मुलाखती पाठोपाठ आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘सामना’त मुलाखत घेण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली.
या मुलाखतीचे चित्रीकरण 20 जुलै पार पडले. राज्य ते केंद्र, अगदी राम मंदिर निर्माणाचा मुद्दा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ते कोरोना प्रादुर्भाव, महाविकास आघाडीचे नेतृत्व ते सरकारचे स्थैर्य अशा प्रत्येक विषयांवर उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत भूमिका त्यांची मांडली.
या मुलाखतीचा पहिला प्रोमो सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवर पोस्ट केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत संजय राऊत यांनी घेतली आहे. येत्या 25 आणि 26 जुलै रोजी दोन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीत राज्यातील कोरोना परिस्थिती आणि ठाकरे सरकारच्या सहा महिन्यांच्या कारभारावर अनेक प्रश्न विचारण्यात आले आहे.
यासंबंधी काहीशी झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री पदाचा प्रवास करत असताना थोडे डोक्यावरचे केस गेले असल्याचं दिसतंय मला. हा या सहा महिन्यातील परिणाम आहे का ? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी स्मितहास्य करून मुख्यमंत्री पदाचा अनुभव सांगायला सुरुवात केली असल्याचं यात दिसत आहे. आता राऊत यांच्या या प्रश्नाला ठाकरे काय उत्तर देणार हे आपणास या मुलाखातीमध्येच पाहायला मिळेल.
मुख्यमंत्री पदाचा अनुभव, कोरोना, लाॅकडाऊन, महाविकास आघाडीतला असमन्वय, राम मंदिर, भाजपसोबत संबंध, सत्तापालट या विषयांवर उद्धव ठाकरे यांना थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
तुळजापूरात जनता कर्फ्युस शंभर टक्के प्रतिसाद
…मग या दांभिक भाजपा नेत्यांना पोटशूळ का व्हावा ? कॉंग्रेस नेत्याची जहरी टीका
कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला
शरद पवारांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु,’सिल्व्हर ओक’वर पाठवणार १० लाख पोस्टकार्ड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
