Share

महिला मतदार वाढविण्यासाठी मुंबई शहरामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी विशेष मोहीम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई, दि. 5: मतदार यादीत महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने आंतरराष्ट्रीय महिला दिन दि. 8 मार्च रोजी महिलांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसर दि.1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारीत अंतिम मतदार यादी दि. 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण 24 लाख 53 हजार 102  मतदार असून त्यामध्ये 13 हजार 46 हजार 904 पुरुष आणि11 लाख 6 हजार 94 स्त्री मतदार आहेत. या यादीमधील आकडेवारीनुसार मुंबई शहर जिल्ह्यामध्ये1 हजार पुरुषांमागे 821 स्त्री मतदारांची नोंद आहे.

अद्याप नाव नोंदविले नाही अशा महिलांचे मतदार यादीत नाव नोंदवून यादीमध्ये महिलांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मुंबई शहर जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची व हळदी कुंकू आदी कार्यक्रमातून महिला मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. नव्याने मतदार यादीत नोंदणी केलेल्या स्त्री मतदारांना ओळखपत्राचे वाटपही यावेळी करण्यात येणार आहे.

मतदार यादीत नाव आहे अथवा नाही याची खात्री महिलांनी ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन करावी.  मुंबई  शहरात सर्वसाधारण रहिवास असलेल्या व दि. 1 जानेवारी2018 रोजी  18 वर्षे पूर्ण झालेल्या व अद्यापपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविले नाही अशा सर्व महिलांनीwww.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या किंवा नमुना 6 भरुन जवळील विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात जमा करावे, असेही आवाहनजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संपदा मेहता यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!