सोलापुर : कोरोनाविरुद्धच्या लढाईत आज पोलीस, डॉक्टर, नर्स यांच्यासह पत्रकारांचेही मोठे योगदान आहे.त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांचा विमा उतरविण्यास तयार आहे, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
आमदार सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी कॉल कॉन्फरन्सद्वारे शहर आणि जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधून कोरोनाविरुध्दच्या लढाई बाबत त्यांचे मार्गदर्शन आणि सूचना घेतल्या. आमदार देशमुख म्हणाले की, आजच्या परिस्थितीत पोलीस, डॉक्टर नर्स याप्रमाणे पत्रकारही स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरूना विरुद्धची लढाई लढत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचे संरक्षण करणे ही आपले कर्तव्य आहे. त्यासाठी ज्या पत्रकारांचा विमा नाही त्या पत्रकारांचा विमा सोलापूर सोशल फाउंडेशन च्या वतीने काढण्यात येईल. राज्य शासनाकडूनही पत्रकार बांधवांसाठी विमा मिळवण्यासाठी आपण निश्चित पाठपुरावा करू. यावेळी पत्रकार राजकुमार सारोळे, सांगोल्याचे दिलीप घुले, मोहोळ येथील बालाजी शेळके, समाधान वाघमोडे, संजीव इंगळे, विजयकुमार पिसे, नारायण चव्हाण, नितीन ठाकरे, अजित उंब्रजकर, सागर सुरवसे, पंढरपूरचे भारत नागणे, रणजीत जोशी यांसह अनेक पत्रकारांनी सुभाष देशमुख यांच्याशी संवाद साधत सोलापूरच्या सध्याच्या घडामोडी बद्दल काही सूचना केल्या. सोलापुरात कोणाचा संसर्ग नक्की कोणामुळे झाला याची माहिती त्वरित मिळणे आवश्यक आहे, आमदार देशमुख यांनी त्याबाबत प्रशासनाकडे विचारणा करावी असे पत्रकार सागर सुरवसे यांनी सूचवले. भागातील अनेक पत्रकारांनी गावागावात रेशन व्यवस्था सुरळीत करावी, यासाठी प्रशासनाला आदेश द्यावेत, प्राथमिक आरोग्य केंद्रास संरक्षण करीत द्यावेत असे अशी मागणी केली.
फाउंडेशन कडे पत्रकारांची यादी द्या
ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्यातील पत्रकारांनी एकाकडे आपल्या सर्व पत्रकारांची यादी द्यावी आणि सोलापूर सोशल फाउंडेशन कडे ती सुपूर्त करावी त्यांचा त्वरित विमा उतरविण्यात येईल असे आ. देशमुख यांनी सांगितले.


