अहमदनगर : राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख स्वत: हून होम क्वारंटाइन झाले आहेत. शंकरराव गडाख यांच्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची तातडीनं कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. ट्विट करत शंकराव गडाख यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, शंकरराव गडाख यांचं गाव असलेले नेवासे तालुक्यातील सोनई येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सोनईसह परिसर सील करण्यात आला होता. स्वत: शंकरराव गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी गावात विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने 11 पथके कार्यरत केले असून परसरात तपासणी करण्यात येत आहे.
नमस्कार ,
काल दि 17जुलै रोजी माझी पत्नी यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून आज शनिवारी दि 18 जुलैला माझा स्वब दिलेला आहे . त्यामुळे मी स्वतः होम कोरंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे .
आपणही आपल्यासह कुटूंबियांची काळजी घ्या.
घरी रहा, सुरक्षित रहा…
– शंकरराव गडाख पाटील— Shankarrao Gadakh Patil (@GadakhShankarao) July 18, 2020
सोनई गावात एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाल्यानं संपूर्ण गाव 14 दिवसांसाठी हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गावकडे येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनांचा आढावा घेतला होता. शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनिता गडाख या माजी पंचायत समिती सभापती आहेत सामाजिक कार्यात अग्रस्थानी असतात त्यामुळे सौ.गडाख या लवकर व्हाव्यात यासाठी परिसरातून प्रार्थना करण्यात येत आहे.
ठरलं तर ! पंकजा मुंडेंची दिल्ली वारी नक्की, राष्ट्रीय कार्यकारणीत मिळणार स्थान
दरम्यान, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा कोरोना रिपोर्ट यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना पुढील उपचारासाठी निलंगा (जि. लातूर) येथून पुण्यात हलवण्यात आलं आहे. राज्यात सगळ्यात आधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आता हे नेते कोरोनामुक्त झाले आहेत.
अतिक्रमण काढा नाहीतर कारवाई करू;मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

