तुळजापूर : येथील हाडको भागात पंधरा ते सोळा कुत्र्यांना विषारी औषध देवुन मारल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.हे कुत्री घरफोडी व चोरी करण्याचा उद्देशाने मारले असल्याचा आरोप हाडको भागातील रहिवाशांनी केले आहे.
निसर्ग’ चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला फटका, उद्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक
शहरात चारचाकी वाहने फोडण्याची घटना ताजी असताना आता कुञ्यांना मारण्याची घटना घडल्याने शहरात सर्वञ असुरक्षिततेचे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या गाडी फोडणे कुञ्याची हत्या करणे या घटना राञीच्या अंधारात घडत असल्याने गस्त वाढविण्यची मागणी होत आहे.
या घटनेची अधिक माहीती अशी की, हडको परिसरात चोरी घरफोडी करण्याच्या उद्देशाने अज्ञात मंडळीनी या भागातील पंधरा ते सोळा पाळीव कुञ्यांना विषारी औषध देवुन मारुन अंबाई हाँस्पीटलचा समोरील भागात टाकलेले आहे. तरी याचा शोध घेवुन त्यांच्या वर प्राणी हत्येचे गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपाईने पोलिसांना निवेदन देवून केली आहे.
‘रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा’
दरम्यान, केरळमधील मलप्पुरमध्ये गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. एका भुकेल्या गर्भवती हत्तीणीचा फटक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्याने मृत्यू झाला होता. या फटाक्यांच्या स्फोटानंतर या हत्तीणीला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे हत्तीणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली होती. या अमानवीय घटनेचे पडसाद सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

