टीम महाराष्ट्र देशा : बटाटा हे थंड हवामानातील पिक आहे. या पिकास सरासरी १६ ते २१ सेल्सिअस तापमान लागते. पिकाच्या सुरवातीच्या काळात २४ सेल्सिअस पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात २० सेल्सिअस तापमान अनुकूल असते. बटाटे लागवडीच्या वेळी उष्ण हवामान व बटाटे पोसण्याचे वेळी थंड हवामान या पिकास पोषक असते.
मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या रीतीने करता येते. जमीन कसदार भुसभुशीत व उत्तम निचऱ्याची असावी. जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असावा. जमीन नांगरानी २० ते २५ सेंमी नांगरावी. १ महिनाभर जमिनीस उन्हाची ताप द्यावी. पुन्हा १ आडवी नांगरणी करावी. ढेकळे फोडण्यासाठी व जमीन समपातळीत आणण्यासाठी कुळवाच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी, जमिनीत हेक्टरी ५० गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरावे.
बटाट्याची लागवड खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात करतात व रब्बी हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात करतात. सरासरी बेण्याचे वजन जास्तीत जास्त २५ ते ३० ग्रॅम असावे. बेण्याचा आकार म्ध्याम असून बटाट्याचे आकारमानानुसार दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंमी आणि दोन बियांमधील अंतर १५ ते २० सेंमी ठेवावे. ट्रँक्टरच्या सह्हायाने सरी वरंबापद्धतीने लागवड करावी.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176444759629393928?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176444293898100736?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176433420039098369?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

