Share

भल्याभल्या गोलंदाजाच्या चिधंड्या उडवणारा ख्रिस गेल, ‘मातृदिनी’ झाला भावूक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : युनिवर्सल बॉस म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये ज्याची ख्याती आहे असा वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल ओळखला जातो. समोर कोणताही गोलंदाज असो त्याचा चेंडु सिमापार धाडण्याचे काम चोख बजावतो. याव्यतीरिक्त ख्रिस गेल नेहमीच आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. मात्र रविवारी ‘मदर्स डे’ निमीत्त गेलने एक व्हिडीओ शेअर केला होता.

रविवारी ९ मे रोजी जगभरात जागतीक मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी गेलने एक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला, या व्हिडीओत ख्रिस गेल हा आईच्या आठवणीत भावूक झाला होता. या व्हिडिओला कॅप्शन देताना गेलने लिहिले की ‘मला माहित आहे माझा तुला अभिमान आहे, आई तुझी खुप आठवण येते. मी तुझे दिलेले हसु नेहमीच कायम ठेवेन.’ असे कॅप्शन देताना तो एक गाणे म्हणत होता. यादरम्यान त्याचे डोळेही पाणावले. तसेच या कॅप्शनमध्ये त्याने ‘हॅप्पी मदर्स डे’ असे लिहीले.

आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये ख्रिस गेल हा पंजाब किंग्स संघाकडून खेळत असतो. गेलला टी-२० क्रिकेटचा बादशाह म्हणले जाते. कारण टी-२० क्रिकेटमध्ये गेलने ४२४ सामन्याच ३७.८६ च्या सरासरीने तब्बल १३८९८ धावा ठोकल्या आहेत. यात २२ शतके आणि ८६ अर्धशतकांचा समावेश आहे. टी२० क्रिकेटमध्ये गेलने आजपर्यंत १०७३ चौकार आणि १०१७ षटकार मारले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!