औरंगाबाद : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतांनाच गेल्या आठ दिवसापासून शहरात साथ रोग फोफावत आहे. यात मलेरिया, डेग्यू, काविळ सारख्या आजारांचा समावेश आहे. विशेषतः खासगी रुग्णालयात या आजारांच्या रुग्णांची गर्दी दिसून येते.
शहरात कोरोना संसर्गाच्या दुसNया लाटेने थैमान घातले. मार्च ते जून या चार महिन्यात कोरोना संसर्गाचे हजारो रुग्ण आढळून आले. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात कोरोना रुग्णाचा आकडा एका संख्येवर आला आहे. त्यामुळे कोरोनासाठी लागू केलेले निर्बंध हटविण्यात आले. कोरोना अटोक्यात येत नाही तोच शहरात साथीच्या आजाराने धुमावूâळ घालण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठ दिवसापासून मलेरिया, डेंग्यू, काविळ, चिकुन गुणियाचे रुग्ण मोठया संख्येने आढळून येत आहे. खासगी रुग्णालयासह दवाखान्यात देखील रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. पावसामुळे रस्त्याच्या बाजूला आणि मोकळया जागा, घराचा परिसर या ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच घराच्या गच्चीवर वापरासाठी टाक्या व हौदामध्ये साठवूण ठेवलेल्या पाण्यात डेग्यू डासाची उत्पत्ती असल्याने डेग्यूची साथ देखील जोरात सुरू आहे. अगोदर ताप येतो, त्यानंतर डेग्यूची लागण होते.
डेंग्यूमुळे प्लेटलेट कमी होण्याचा धोका आहे. तसेच दुषित पाण्यामुळे काविळचे रुग्ण देखील मोठया संख्येने आढळून येत आहे.दररोज साधारणपणे साथीच्या आजाराचे दिड ते दोन हजार रुग्ण तपासणीसाठी खासगी दवाखाने, रुग्णालयात जात आहे.
मनपाच्या आरोग्य वेंâद्रासह खासगी दवाखाने व रुग्णालयात मलेरिया, डेंग्यू, काविळ आजाराचे रुग्ण उपचारासाठी येत आहे. मनपाकडून औषध फवारणी, पाण्यात अबेट टाकणे, धुरफवारणी, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडले जात आहे. नागरिकांनीही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
डॉ. नीता पाडळकर
आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या नावाने चाकणमध्ये पैशांची मागणी; मंत्रालयानंतर आणखी एक प्रकरण आले समोर
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- बाप्पा कोरोना घालव रे…! पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला महत्वाचा निर्णय
- ‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय!’; बदलीसाठी थेट मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ फोनमुळे खळबळ
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाबाबत खा. प्रीतम मुंडेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

