Share

…या परिस्थितीतही उद्योगचक्र गतिमान ठेवण्यात महाराष्ट्राला यश-सुभाष देसाई

Published On: 

मुंबई : आज महाविकास आघाडी सरकार स्थापनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळून २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले होते. यावरच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai)यांनी ट्वीट करत दोन वर्षपुर्तीला महाविकास आघाडीची कारकीर्द मांडली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारकीर्दीस दोन वर्षे पूर्ण होत असून, यापैकी दीड वर्षांहून अधिक कार्यकाळ करोनाचा मुकाबला करण्यात गेला. अशाही परिस्थिती उद्योगचक्र गतिमान ठेवण्यात महाराष्ट्राला यश आले. मागील दोन वर्षांत राज्यातले उद्योगचक्र थांबले नाही, थांबणार नाही यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केले. उद्योग विभागाने मागील दीड वर्षांत देश-विदेशांतील ६० हून अधिक कंपन्यांसोबत सुमारे ३.३० लाख कोटींचे सामंजस्य करार केले. असे ट्वीट सुभाष देसाई यांनी केले आहे.

दरम्यान आजच्या दिवसाला मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी एक लेख ट्विट करत महाविकास आघाडी सरकारची कारकीर्द अधोरेखित केली आहे. महाराष्ट्र शासन राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद!कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार.अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आल्या पण आम्ही विचलित झालो नाहीत आणि पुढेही होणार नाही. कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी त्यांना केंद्रबिंदू मानून आमचं काम अखंड सुरू राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याभावना व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!