टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. आता राज्य सरकारने २० एप्रिल नन्तर राज्यातील काही भागात खबरदारी घेऊन औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबतची माहिती राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाकडून ट्वीटरवर देण्यात आलं आहे.
काय म्हटलंय राज्य सरकारने –
राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन, अटी व शर्तींच्या अधीन राहून २० एप्रिलनंतर औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू होणार. अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहण्याच्या दृष्टीने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
#coronavirus चा मुकाबला करणे हे #Lockdown चे मूळ उद्दिष्ट. ते अबाधित राखून कंटेंनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
केंद्राने निर्देश दिल्याप्रमाणे ३ मे पर्यंत #Lockdown . त्याचे अतिशय काटेकोर पालन केले जाणार. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळण्यासह नियमित मास्क घालणे आणि इतर कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण
कुठल्याही कारणांसाठी गर्दी चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थना स्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी नाही. लोकांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विनाअडथळा मिळत राहतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
#coronavirus चा मुकाबला करणे हे #Lockdown चे मूळ उद्दिष्ट. ते अबाधित राखून कंटेंनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 17, 2020
कुठल्याही कारणांसाठी गर्दी चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थना स्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी नाही. लोकांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विनाअडथळा मिळत राहतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 17, 2020
‘लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी.
अतिरिक्त औद्योगिक घटकांसह, शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट
१०% शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य
मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी एसटी व बेस्टची विशेष बस सुविधा’
लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी
✅ अतिरिक्त औद्योगिक घटकांसह, शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट
✅ १०% शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य
✅मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी एसटी व बेस्टची विशेष बस सुविधा
➡️ वाचा | https://t.co/7bPf3eHX4g— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 17, 2020
सरकारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु होणार –
शासकीय कार्यालय आणि इतर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत २१ एप्रिलपासून मंत्रालयापर्यंत अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन. त्यानुसार पनवेल, ठाणे, पालघर आदी ठिकाणांपासून एकूण ५० नवीन फेऱ्या सुटणार.
शासकीय कार्यालय आणि इतर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत २१ एप्रिलपासून मंत्रालयापर्यंत अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन. त्यानुसार पनवेल, ठाणे, पालघर आदी ठिकाणांपासून एकूण ५० नवीन फेऱ्या सुटणार. pic.twitter.com/BeWXDyPbDy
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 17, 2020
मंत्रालयात आणि इतर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ‘बेस्ट’ सोडणार अतिरिक्त बसेस. बोरिवली, वांद्रे, पनवेल, ठाणे, विक्रोळी, वरळी, गोराई, ऐरोली, दहिसर, राणी लक्ष्मीबाई चौक, आणिक आगार आदी ठिकाणांपासून सुटणार बसेस.
मंत्रालयात आणि इतर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'बेस्ट' सोडणार अतिरिक्त बसेस. बोरिवली, वांद्रे, पनवेल, ठाणे, विक्रोळी, वरळी, गोराई, ऐरोली, दहिसर, राणी लक्ष्मीबाई चौक, आणिक आगार आदी ठिकाणांपासून सुटणार बसेस. pic.twitter.com/PFagcKZV4D
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 17, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now