Share

आनंदाची बातमी : ‘या’ जिल्ह्यातील शनिवार, रविवारची संचारबंदी कायमस्वरुपी बंद

Published On: 

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर आठवड्यातील ६० तासांची संचारबंदी रद्द करण्यात आली. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी जारी केले आहेत. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ देखील कोरोना प्रतिबंधतत्मक उपाययोजनांसाठी लागू करण्यात आला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रकिया १९७३ चे कलम १४४ (१), (२) व (३) अन्वये १ ऑगस्टपासून जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले. यामध्ये शुकवारी सायंकाळी ७ ते सोमवार सकाळ ७ पर्यत संचारबंदी करण्यात आली होती. मात्र, आता संचारबंदीचे आदेश रद्द करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जाहीर केले.

दोन आठवड्यांपासून शहरातील संचारबंदीमध्ये काही भागांत खुलेआम उल्लंघन होत असताना, पोलीस, महापालिका व जिल्हा प्रशासनाद्वार कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. लागोपाठ दोन आठवडे भाजीबाजारही लागला. हा दुजाभाव का, हा सवाल नागरिकांनी प्रशासनाला केला होता.

हे बरोबर नाही! मुंबई पोलीस सत्य व न्यायाच्या मार्गावर असतानाच त्यांना रोखले; सामनातून सीबीआय चौकशीवर घणाघात

‘मिशन बिगीन अगेन’तंर्गत राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. आता सण-उत्सवांच्या दिवसांत संचारबंदीच्या आदेशाबाबत नागरिकांमध्ये नाराजी होती. अनेक उद्योग, व्यवसायांना या काळात समस्या उद्भवत असल्याने हा कर्फ्यू रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी उठविण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र, दुकाने, बाजार उघडण्याची विहित वेळ कायम आहे.

मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल पण… शरद पवारांचा सीबीआयला टोला

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!