Share

भारताच्या पराभवाला प्रशिक्षकचं जबाबदार, हरभजनची शास्त्रींवर शेलक्या शब्दात टीका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासाठी कोच रवी शास्त्री जबाबदार असून त्याने यावर काहीतरी बोलणं गरजेचं आहे असं म्हणत हरभजन सिंहने शास्त्री यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रवी शास्त्रींची चुकलेली धोरणंच पराभवाला जबाबदार असल्याचं सांगत हरभजनने पराभावाचं खापर शास्त्री यांच्या डोक्यावर फोडलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे हरभजनने ?

‘भारताचा संघ सर्वोत्कृष्ट टुरिंग टीम आहे असा दावा रवी शास्त्रींनी केला होता. एकदिवसीय सामन्यांची मालिका हरल्यानंतर आता कसोटी मालिकाही भारत हरला तर आपला दावा चुकीचा होता.प्रत्येक सामन्यात संघामध्ये बदल केल्याचा खेळावर परिणाम होत आहे आणि त्यामुळे भारत हरतोय. लॉर्ड्स कसोटी सामन्यासाठी दोन स्पिनर्सचा समावेश टीममध्ये करण्यात आला होता.

पण पावसामुळे धावपट्टी ओली होती. तेव्हा आधीचा वेगवान गोलंदाजांचा समावेश असलेलाच संघ घेऊन भारत मैदानात उतरला असता तर निकाल काही वेगळा लागू शकला असता. कुठल्याही सामन्यात ओपनींग पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची ठरते. दरवेळी नवीन फलंदाज सामन्याची सुरुवात करत असतील तर त्यांचा जम बसणं कठीण असतं.त्यामुळे बॅटिंग ऑर्डरमध्ये जास्त बदल करण्यात येऊ नयेत’.

आरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी – कारणे आणि उपाय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!