टीम महाराष्ट्र देशा:देशात अनेक विद्यापीठ असतील पण भानगडी एक दोन विद्यापीठातच होताना दिसतात. जगात ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड विद्यापीठ आहेत पण दर्जेदार शिक्षण हेच त्या विद्यापीठांची ओळख आहे. एक मोठा माणूस बोलून गेलाय ‘जे माणसातली माणुसकी जिवंत ठेवते ते खरं शिक्षण’अशा शब्दात ट्वीट करत भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी जे एन यु प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे.
दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे पडसाद देशभरात आणि राज्यात उमटताना दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत निदर्शनं करण्यात आलेली आहेत.
याच विषयावर आपले मत व्यक्त करत निलेश राणे यांनी जे एन यु आणि इतर विद्यापीठांना खडे बोल सुनावले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
