मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुंचा दुसरा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करणार आहे.
या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. निर्धारीत कार्यक्रमानुसार १४ जुनपासुन श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल होत आहे. विमानतळावरील खेळाडुंचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. श्रीलंका दौऱ्यातील भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने मुंबईत पोहोचताच इंन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट केला. या फोटोत त्याच्यासोबत भुवनेश्वर कुमार दिसत आहे. यांच्याव्यतिरिक्त कुलदीप यादव, दीपक चहर, नितीश राणा हे देखील मुंबईत दाखल झाले आहेत. १४ ते २८ जुन या कालावधीत हे खेळाडू मुंबईतच एका हॉटेमध्ये विलगीकरणात राहणार आहे. यादरम्यान त्यांची ६ वेळेस कोरोना चाचणी करण्यात येईल.
https://www.instagram.com/p/CQGgzg_t6CU/
विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर ३० जुन रोजी भारतीय संघ श्रीलंकेला रवाना होईल. तिथे त्यांना काही दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर सराव करण्यास परवानगी मिळेल. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहे. भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू हे इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्याने या दौऱ्यात युवा आणि खराब कामगीरीमुळे संघातील स्थान गमावलेले खेळाडू या दौऱ्यावर जातील. या दौऱ्यातील काही खेळाडूंना आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत संधी मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पवित्र रिश्ता ‘ मालिकेमध्ये मानवच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा


