🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा:- सुरत येथे आज (ता. २९) दक्षिण आफ्रिकेविरुध्द तिसरा सामना खेळण्यात येणार आहे. अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. या सामन्यात अखिल भारतीय महिला निवड समितीने दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरूद्ध मागील दोन टी -२० सामन्यांसाठी महिला संघात न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला पहिल्या तीन सामन्यांसाठी संघाची निवड झाली.
पाच सामन्यांच्या मालिकेत आता भारत १-० ने आघाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यात पाऊस पडला.तिसरा सामना रविवारी (ता. २९ ) तर चौथा सामना १ ऑक्टोबर आणि पाचवा ४ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने सूरतमध्येच खेळले जातील.
कर्णधार हरमनप्रीत कौरआणि अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ११ धावांनी विजय मिळवून दिला. तर २४ सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात हरमनप्रीतने ३४ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांत ४३ धावा केल्या. याशिवाय स्मृती मंधानाने २१, जेमिमा रॉड्रिग्स १९ आणि दीप्ती शर्माने १६ धावांचे योगदान दिले, ज्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने आठविकेट्ससाठी १३० धावा केल्या.
असा असेल भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (विकेटकीपर), पूनम यादव, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकर, राधा यादव, वेद कृष्णमूर्ती , हर्लीन देओल, अनुजा पाटील, शेफाली वर्मा, मानसी जोशी.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178208321293021184?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178212663416868864?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
