मुंबई : क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टार स्पोर्ट्सवर पुन्हा एकदा इंडिया वि. पाकिस्तान सामन्याची थरारकता अनुभवता येणार आहे. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याने अनेक नियोजित क्रिकेटचे सामने हे रद्द करण्यात आले आहेत. तसेच इंडियन प्रीमियर लीग देखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी हा काळ काहीसा सुन्ना सुन्ना जात आहे. मात्र यावर आता तोडगा म्हणून स्टार स्पोर्ट्सकडून आता पर्यंत झालेल्या वर्ल्डकपमधील इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेले सामने पुन्हा दाखवण्यात येणार आहेत.
Hi! Watch the full match replay of some of Team India's classic wins over Pakistan, starting with their ICC CWC 1992 match, on April 4 from 11:00 AM on Star Sports 1/1 HD, 1 Hindi/1 HD Hindi and Star Sports First and ICC CWC 1996 match on April 5 at the same time and channels.
— Star Sports (@StarSportsIndia) March 28, 2020
4 ते 10 एप्रिल या कालावधीत हे सामने दाखवण्यात येणार आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून याचे प्रसारण होणार आहे. 4 एप्रिल – 1992 चा वर्ल्ड कप, 5 एप्रिल – 1996 चा वर्ल्ड कप, 6 एप्रिल – 1999 वर्ल्ड कप, 7 एप्रिल – 2003 वर्ल्ड कप, 8 एप्रिल – 2011 वर्ल्ड कप, 9 एप्रिल – 2013 वर्ल्ड कप, 10 एप्रिल – 2019 वर्ल्ड कप अशाप्रकारे आतापर्यंत झालेले सर्व सामने दाखवण्यात येणार आहेत.
दरम्यान कोरोनाचा फटका क्रिकेट जगातला देखील बसला आहे. अनेक देशांचे नियोजित सामने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे त्यांना टाईमपास म्हणूनही क्रिकेट पाहता येत नाही.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

