मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे.
या स्पर्धेआधी आयसीसीच्या स्पर्धेत भारताने न्युझीलंड विरुद्ध अखेरचा विजय हा २००३ च्या विश्वचषकात मिळवला होता. यानंतर भारताना न्युझीलंडविरुद्ध सतत अपयश आले आहे. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने न्युझीलंडला ७ गडी राखुन पराभव केले होते. यानंतर २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ जगज्जेता ठरला होता. मात्र या स्पर्धेतील एकमेव सामना भारताने न्युझीलंडविरुद्ध १० धावांनी गमावला होता. यानंतर २०१६ टी-२० विश्वचषक स्पर्धेत ४७ धावांनी पुन्हा न्युझीलंडविरुद्ध पराभुत झालो होतो. तर डब्ल्युटीसी स्पर्धेतील कसोटी मालिकेतही भारताला २-० असा पराभव स्विकारावा लागला. तर २०१९ विश्वचषक स्पर्धेतील भारताचा संघाचा पराभव क्रिकेट रसिक आजही विसरु शकले नाही.
डब्ल्युटीसी सामन्यात भारतीय संघाला न्युझीलंडचा सामना करायचा आहे. मागील १८ वर्षापासुन जेव्हा आयसीसीची कोणतीही स्पर्धा येते तेव्हा न्युझीलंड संघाविरुद्ध भारताला कायम हार पत्कारावी लागली आहे. मात्र आता डब्ल्युटीसी सामन्यात भारतीय संघ १८ वर्षे पराभवाची साखळी तोडतो का न्युझीलंडचा संघ भारताविरुद्ध विजयरथ कायम राखतो याची उत्सुकता क्रिकेट रसिकांना लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवरच भुंकतो’; भातखळकरांचा पलटवार
- एमपीएससीच्या परीक्षांचा घोळ सुरूच; मागणी पत्र न दिल्याने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होईना?
- फुलंब्री तालुक्यात पेरणी करतांना वीज पडून अठरा वर्षीय तरुणी ठार
- ‘आम्ही जंगलामध्ये असणाऱ्या वाघांशी दोस्ती करतो, पिंजऱ्यामध्ये असणाऱ्याशी नाही’
- लग्नानंतर सोनाली देतीये फिटनेसचे धडे : पहा फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

