Share

‘आम्ही जंगलामध्ये असणाऱ्या वाघांशी दोस्ती करतो, पिंजऱ्यामध्ये असणाऱ्याशी नाही’

Published On: 

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.‘उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत,’ असं विधान करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा ‘युती’चे संकेत दिलेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज उत्तर दिले आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.’

संजय राऊत यांच्या या विधानाचा आता चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘संजय राऊत याचं म्हणण खरं आहे. आम्ही जंगलामध्ये असणाऱ्या वाघांशी दोस्ती करतो, पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या वाघांशी नाही. वाघ जोर्पर्यंत बाहेर होता तोपर्यंत आमची दोस्ती होती. पण आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात अडकलाय. त्यामुळे आमची दोस्ती ही फक्त जंगलामध्ये असणाऱ्या वाघांशीच होते.’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना चागलच फैलावर घेतले आहे. ते पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!