Share

संतापजनक : चिन्यांचे शेपूट वाकडंच, भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झडप

Published On: 

🕒 1 min read

लडाख : गेले काही महिने भारत-चीन सीमावाद पेटला असून चीनची खोड अजूनही मोडली नसल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे. जून महिन्यात चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यावेळी चिनी सैन्याला रोखताना चिनी सैन्याने केलेल्या धारधार हत्यारांच्या हल्ल्यामुळे भारताचे २० जवान शाहिद झाले होते. यानंतर सीमाभागात प्रचंड अशांतता निर्माण झाली होती.

भारताने देखील या घुसखोरीला विविध माध्यमातून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती. यानंतरही सीमाभागात चीनच्या हालचाली वाढल्याचे दिसून आले होते. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या मात्र त्या निष्फळ ठरल्याचे समोर आले होते.

‘गडचिरोलीचा विकास झाल्यास नक्षलवादाचा नायनाट होईल…’

चिन्यांचे शेपूट वाकडंच असून २९-३० ऑगस्टच्या रात्री भारत-चीन सैन्यामध्ये पुन्हा झटापट झाली आहे. ईस्टर्न पॅंगॉग झील भागात दोन्ही देशाच्या सानिकांमध्ये ही झडप झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारतीय सैन्य पुन्हा एकता अलर्टवर असून चिनी सैन्याला जशास तसे उत्तर देण्यात आले आहे.

‘प्रशांत भूषण आगे बढो…आप के पिछे पाकिस्तान है…’, भाजप नेत्याची जहरी टीका

संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘चीनच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांनी उकसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी देखील त्याला उत्तर दिलं. भारतीय सैन्य शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. चर्चेतून वाद संपवला जावू शकतो. पण तरी देखील आम्ही आमच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.’  असे चीनला ठणकावून सांगण्यात आले आहे.

मोठी बातमी: अभिनेता सुबोध भावेसह पत्नी व मुलाला कोरोनाची लागण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!