🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या क्रिकेट विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये एकूण १५ खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे तर रोहित शर्मा उपकर्णधार असेल.
मुंबईत आज निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत १५ जणांच्या टीम इंडियावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडू आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांना संघात जागा मिळवण्यात अपयश आले आहे.
निवड झालेल्या संघामध्ये रोहित शर्मा, शिखर धवन हे सलामीवीर आहेत तर लोकेश राहुल हा राखीव सलामीवीर असेल. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या हे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत. युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्यावर फिरकीची मदार असेल तर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज संघात आहेत.
विश्वचषकासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी
India’s squad for the ICC #CWC19 announced: Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), Shikhar Dhawan, KL Rahul, Vijay Shankar, MSD (wk), Kedar Jadhav, Dinesh Karthik, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Bhuvneshwar Kumar, Jasprit Bumrah, Hardik Pandya, Ravindra Jadeja, Mohd Shami
— BCCI (@BCCI) April 15, 2019
#TeamIndia for @ICC #CWC19 ????????#MenInBlue ???? pic.twitter.com/rsz44vHpge
— BCCI (@BCCI) April 15, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

