Share

श्रीलंकेनंतर आता भारत आणि बांग्लादेशला ‘इसिस’कडून दहशतवादी हल्याची धमकी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : श्रीलंकेनंतर आता भारत आणि बांग्लादेशला देखील इसिस ने दहशतवादी हल्याची धमकी दिली आहे. इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या ‘अल मुरसलत’ नावाच्या दहशतवादी संघटनेनं याबाबतचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. या पोस्टरमधून भारत आणि बांग्लादेश येथे श्रीलंकेप्रमाणे दहशतवादी हल्ला करून बदला घेणार असल्याचा आशय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत तीन चर्चं आणि तीन हॉटेलमध्ये आत्मघातकी भ्याड हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात ३०० लोकांना मारण्यात आलं, त्यानंतर श्रीलंकेच्या सरकारने या हल्ल्याचे सूत्रधार इसिस असावी असा अंदाज बांधला होता. पण अखेर हा हल्ला आम्हीच घडवून आणल्याच सांगत इसिसने आता भारताला देखील धमकी दिली आहे.

गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार इसिसनं अबू मोहम्मद अल- बंगालीला बांगलादेशातील आपला म्होरक्या नियुक्त केला आहे. बंगालीला दहशतवादी हल्ल्याची योजना बनवणं आणि दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. धमकीचे पोस्टर प्रसिद्ध करण्याआधीही इसिसनं बांगलादेशची राजधानी ढाकातल्या गुलिस्ताँ थिएटरमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट घडवला होता. यात कोणाचा मृत्यू झाला नसला तरी पोलीस कर्मचारी जखमी आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!