पुणे : जगभरात कोरोना विषाणूंचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जगातील तब्बल 165 हून अधिक देश या भयंकर आजाराच्या संकटात सामोरे जात आहेत. इटलीमध्ये या विषाणूमुळे सर्वाधिक विनाश झाला आहे. चीन, इटली, फ्रान्स, इराण,इराक, दुबईनंतर आता भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढत आहेत. आतापर्यंत संपूर्ण जगात 11 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.
कोरोनाचे देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या ६४ वर पोहचली आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता कठोर निर्णय घेत आहेत. यापूर्वी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहे. तर उद्यापासून लोकल सेवा सर्वसामान्य लोकांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत. पहिली ते आठवीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गरज भासल्यास पूर्णपणे लॉकडाऊन चा कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही सरकारने दिला आहे.
आता चीनपाठोपाठ भारतातही भारतानेही महत्त्वाची पावले उचलायला सुरवात केली आहे. कोरोनाच्या महाभयंकर आजाराचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘जनता कर्फ्यू’ चे आवाहन केले आहे. या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेला हे आवाहन केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

