Share

पोळा, मारबत सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास नागपुरात प्रतिबंध

Published On: 

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरेक्षेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १८ ऑगस्ट ला साजरा होणारा बैल पोळा व १९ ऑगस्ट ला साजरा करण्यात येणारा तान्हा पोळा सण सार्वजनिक ठिकाणी तसेच सामूहिक स्वरुपात साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे. तसेच १९ ऑगस्ट ला साजरा होणारा मारबतीचा कार्यक्रम व मिरवणूक काढण्यावर प्रतिबंध घातला आहे. तसेच नागरिकांनी हा सण घरीच साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

मनपा आयुक्तांनी या संबंधाचे आदेश शुक्रवार (१४ऑगस्ट)ला काढले आहे. नागपूरात बैल पोळा, तान्हा पोळा आणि मारबत मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. दरवर्षी हजारो लोक या कार्यक्रमात सहभागी होतात. या गर्दीत सामाजिक अंतर ठेवणे अतिशय कठीण असल्याने कोविड-१९ च्या संसर्ग वाढण्याची शक्यता या कार्यक्रमामुळे नाकारता येत नाही. मनपा आयुक्तांनी लोकहिताच्या दृष्टीने व नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचा हितास्तव कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार मारबत दहनाचा कार्यक्रम टाळण्याचा आग्रह केला आहे परंतु दहन करणे जर परंपरेनुसार आवश्यक असल्यास तो साजरा करताना पाच पेक्षा जास्त नसतील इतक्या व्यक्तिंच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून व त्रिस्तरिय मास्क घालून मनपा तसेच पोलिस विभागाची पूर्व अनुमती प्राप्त करुन नियमानुसार साजरा करता येईल. आयुक्तांनी नागरिकांना घरीच सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. जर आदेशाचे उल्लंघन झाले तर भादंवि कलम १८८ व अनुषंगीक कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.

डॉ. निलंगेकर यांचा निलंग्यात भव्य पुतळा उभा करण्याची;सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी

किंग्ज ११ पंजाबच्या त्रिशतकवीर खेळाडूने केली कोरोनावर मात

सुशांतसिंग प्रकरणावरून रोहित पवार यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!