Share

IND VS PAK | कोहली-हार्दिकने दिवाळी साजरी केली, पाकिस्तानला लोळवले ; 4 विकेट राखून विजय

Published On: 

🕒 1 min read

IND VS PAK | T20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामना भारताने जिंकला. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ खेळले. गेल्या टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे होता. अन् भारताने बदला घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या 7 ओव्हरमध्ये भारताचे 4 खेळाडू तंबूत परतले. मात्र कोहली आणि हार्दिकने दिवाळी साजकी केली आणि पाकिस्तानवर 4 विकेट राखून विजय मिळवला.

विराट कोहलीने त्याला नंबर-1 फलंदाज का म्हटले जाते हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. T20 विश्वचषक 2022 मधील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 31 धावांत 4 मोठ्या विकेट्स गमावल्या. यानंतर कोहली आणि हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. यासह संघाने गतवर्षी विश्वचषकात 10 विकेट गमावल्याचा बदलाही घेतला आहे. याआधी पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद आणि शान मसूद यांनी अर्धशतके झळकावली. कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. 6 चौकार आणि 4 षटकार मारले.

नसीम शाहने भारतीय संघाला पहिला धक्का दिला आहे. केएल राहुल त्याच्या बॉलवर 4 धावा काढून बोल्ड झाला. त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. भारतीय संघाला दुसरा धक्का कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने बसला आहे. रोहित शर्माला इफ्तिखार अहमदने हारिस रौफच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद केले. सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर त्याने 10 चेंडूत 15 धावा केल्या आणि मोहम्मद रिझवानकडे हरिस रौफकडे झेलबाद झाला. त्यानंतर अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र तो फार काही करु शकला नाहीत. पटेल अवघ्या 2 धावा करून धावबाद झाला. नंतर हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी मैदानात उतरला. हार्दिक पांड्याच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला. पंड्या 40 धावा करून मोहम्मद नवाजच्या चेंडूवर बाबर आझमकरवी झेलबाद झाला. दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा भारताला विजयासाठी 5 चेंडूत 15 धावांची गरज होती. विराट कोहलीने 20व्या षटकात मोहम्मद नवाजच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला. भारताला आता विजयासाठी 3 चेंडूत 6 धावांची गरज होती.

शेवटच्या षटकातील थरार

भारताला 6 चेंडूत 16 धावा करायच्या होत्या. हे षटक डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजने टाकले. पंड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने 37 चेंडूत 40 धावा केल्या. एक चौकार आणि दोन षटकार मारले. दुसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने धाव घेतली. कोहलीने तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर षटकार मारला. तोही नोबॉल होता. आता 3 चेंडूत 6 धावा हव्या होत्या. चौथ्या चेंडूवर कोहली बोल्ड झाला, पण फ्री हिटमुळे तो आऊट झाला नाही. 3 धावाही मिळाल्या. आता 2 चेंडूत 2 धावा करायच्या होत्या. कार्तिक 5 व्या चेंडूवर यष्टिचित झाला. त्याने 2 चेंडूत एक धाव घेतली. आता एका चेंडूवर 2 धावा हव्या होत्या. नवाजने पुढचा चेंडू वाईड दिला. अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत संघाला विजय मिळवून दिला.

अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने पाकिस्तानी फलंदाजी केली उद्ध्वस्त

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी पाकिस्तानच्या फलंदाजीला पूर्णपणे हादरा दिला आहे. सिंगने जहान ग्रीन संघाचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसह तीन विकेट घेतल्या. त्याचबरोबर पंड्यानने पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. मोहम्मद शमी आणि भूवनेश्वरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!