Share

Brahamastra | रणवीर आणि आलियाचा सुपरहिट चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच होणार OTT रिलीज

Published On: 

मुंबई: रणवीर कपूर आणि आलिया भट यांचा ब्रह्मास्त्र Brahamastra चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. ब्रह्मास्त्र चित्रपटाची चाहते आतुरतेने ओटीटी OTT वर रिलीज होण्याची वाट बघत होते. ब्रह्मास्त्र ने रिलीज होतात बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला होता. त्याचबरोबर प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसातच या चित्रपटाने अनेक विक्रमही मोडले होते. त्याचबरोबर शानदार वीकेंडसह हा चित्रपट वीक डेज मध्ये सुद्धा चमकत होता.

दरम्यान ब्रह्मास्त्रच्या ओटीपी रिलीज बाबत एक मोठे अपडेट समोर आले असून, दिग्दर्शक अयान मुखर्जींनी ब्रह्मास्त्रच्या OTT रिलीजची  घोषणा केली आहे. ब्रह्मास्र हा चित्रपट ऑनलाइन स्ट्रीमिंग प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टार Disney Plus Hotstar वर प्रदर्शित होणार आहे.

या दिवशी ब्रह्मास्त्र होणार OTT रिलीज

रविवारी दि. 23 ऑक्टोबर रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज ची घोषणा करत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला आहे. त्यासोबतच चित्रपटाच्या रिलीज डेट बद्दल ही माहिती देण्यात आलेली आहे. हे सोशल मीडियाच्या पोस्ट वरून मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यातील 4 नोव्हेंबर रोजी ब्रह्मास्त्र OTT प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टार वर रिलीज होणार आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाचा निर्माता करण जोहर यांनी देखील आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर हीच पोस्ट शेअर केलेली आहे. ब्रह्मास्त्र च्या OTT रिलीज च्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये एक वेगळेच प्रकारची खळबळ उडाली आहे.

बॉक्स ऑफिस वर अधिराज्य गाजवणारा चित्रपट 

2022 हे वर्ष बॉक्स ऑफिस साठी थोडे वाईट ठरले होते. सुपरस्टार आमिर खानचा लाल सिंचन दादर अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज यासारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिक वेळ चालले नव्हते. मात्र रणवीर कपूर आणि आलिया भट यांचा ब्रह्मास्त्र चित्रपट हा या वर्षातील सर्वाधिक हिट हिंदी चित्रपटांपैकी एक आहे. 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर 250 कोटी म्हणून अधिक कमाई केली होती. तर या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शन बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जगभरात 400 कोटीहून अधिक कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!