🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ झालेली नव्हती. मात्र आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे. सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल महागले आहे. मुंबईत आज पेट्रोल 58 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 79.49 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 58 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69.37 रुपयांवर गेला आहे.
विद्यार्थी व पालकांनी दहावी-बारावी निकालाच्या कोणत्याही तारखांवर विश्वास ठेवू नये
कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन लावलं गेलं. त्यामुळे सगळीच अर्थव्यवस्था खालावली. सरकारचा महसूल आटला. त्यामुळे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर वरचा व्हॅट 2 रुपयांनी वाढवला होता. सरकारच्या या निर्णयाला मनसेने विरोध केला आहे. मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी पेट्रोल-डिझेलवर नाही तर दारुवर कर वाढवा अशी मागणी केली आहे.
महसूल तूट भरून काढण्यासाठी राज्यसरकारने नुकतीच पेट्रोल व डिझेल वर 2 रुपये मूल्यवर्धित कर (VAT) वाढविला , सरकारने याऐवजी मद्यावरील कर वाढवावा हे मार्च महिन्यापासून सुचवित आहे कारण आधीच आपल्या राज्यात इंधनाचे दर ईतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहेत व त्यात हा अधिभार.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) June 8, 2020
दारु विक्रीला सरकारने महिनाभरापूर्वीच परवानगी दिली होती. त्यानंतर वाईन शॉप्सवर देशभर प्रचंड गर्दी झाली होती. अनेक राज्य सरकारांनी दारुवर भरमसाठ करही लादला होता. तोच धागा पकडत बाळा नांदगावकर यांनी ही मागणी केलीय.
तैमूरसह सैफ-करिनाने मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉकची लुटली मजा
दरम्यान, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलची मागणीत सुधारणा होत आहे. याच दरम्यान कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 40 डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान जवळपास गेल्या 80 दिवसांत तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केला नाही. 16 मार्च रोजी इंधनाच्या किंमतीत बदल झाला होता. त्यानंतर रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
