Share

वाहन चोरट्यांचा धुमाकुळ, तीन दुचाकी लांबवल्या

Published On: 

औरंंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. नाकाबंदी सुरू असतांना देखील वाहन चोरट्यांनी विविध भागातून वाहने लंपास करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.

चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून तीन दुचाकी लंपास करीत नाकाबंदी करणा-या पोलिसांना खुले आव्हान दिले आहे.अमोल केशव थोरवे (२०, रा. वाळुज, नायगाव पाण्याच्या टाकीजवळ) हा १२ मे रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान पुणे-औरंगाबाद महामार्गावरील एका ढाब्याजवळ लघुशंकेसाठी थांबला होता. त्यावेळी त्याची दुचाकी (एमएच-२०-ईबी-५१४०) आणि डिक्कीतील मोबाइल चोराने लंपास केले.

दुस-या घटनेत, प्रज्वल कौतिकराव सुस्ते (वय १९, रा. हडको, गजानन नगर) याने पडेगावातील लष्कराच्या कॅन्टीनसमोर दुचाकी (एमएच-२०-डीक्यू-७७५०) उभी केली होती. चोराने हँडल लॉक तोडून सुस्तेची दुचाकी लांबवली. तिस-या घटनेत, राजेश भीमराव कांबळे (वय ४२, रा. रामनगर) यांनी घरासमोर दुचाकी (एमएच-२०-इयू-३६६५) उभी केली होती. मध्यरात्री चोराने त्यांची दुचाकी लांबवली. विविध भागातून दुचाकी लंपास करणा-या चोरट्याविरूध्द संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!