परभणी : कोरोना व्हायरसने आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी खबरदारीचे आवाहन केलं जात आहे. ‘गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, शक्य असेल तेवढा प्रवास टाळा, तसेच अफवा पसरवू नका,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील केलं आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी काल परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. औषधीच्या साठ्याबाबत माहिती घेऊन औषधे कमी पडणार नाही व शिवभोजन थाळीची संख्या वाढवण्याबाबतही संबंधितांना सूचना दिल्या.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा यावेळी केले.दरम्यान,मलिक यांनी शिवभोजन थाळीची संख्या वाढवण्याबाबत केलेल्या सूचनांचा अनेक सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

