🕒 1 min read
वाशीम : शहरामध्ये प्रशासनाने कोविड चाचणीची सुविधा उपलब्ध जरी केली असली तरी या केंद्रावर घेण्यात येत असलेल्या स्वॅब चाचणी चे अहवाल तीन दिवस किंवा जास्त कालावधी उलटूनसुद्धा कोविड केंद्राला प्राप्त होत नाहीत. त्यामुळे रुग्णाला कळविण्यात वेळ जातो. या कालावधीमध्ये अहवाल अप्राप्त असलेले रुग्ण पॉझिटिव्ह आहेत किंवा नाही हे माहीत नसल्याने समाजामध्ये मोकळ्या मनाने वावरत असतात. त्यांच्या या वावराने अप्रत्यक्षपणे कोविड रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यातील यंत्रणेचा कार्यवेग वाढवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, याकरिता आरोग्य विभाग, सामान्य रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे. त्यांचे म्हणणेनुसार आमच्या कामाचा ताण वाढला आहे. तर त्यांनी विभागीय उपसंचालक व सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे मार्गदर्शन घेऊन चाचणी अहवाल गतीने प्राप्त होण्याकरीता वाशीम येथे कोविड रुग्ण स्वॅब तपासणीकरिता केंद्र सुरू करण्याची मागणीही केली.
अलगीकरण कक्षात तुटपुंजी औषधे असतात, अल्पशा प्रमाणात असतात जीवनसत्व क, बी कॉम्प्लेक्स या पलीकडे काहीही नसते. प्रत्येक केंद्राला शासकीय वैद्यकीय अधिकार्यांचा दर दिवशी राऊंड असावा. अन्यथा प्रशासनामधील काही लोकांचे दुर्लक्षामुळे, ढिसाळपणामुळे गंभिर परिस्थीती निर्माण होईल व त्यामुळे अप्रत्यक्षरित्या समाजघटकामध्ये कोविड रुग्ण वाढ होण्यास हे कारण कारणीभूत ठरतील.
निवेदनाच्या शेवटी त्यांनी नमूद केले की, आरोग्य विभागाचे, सामान्य रुग्णालयाचे कार्यालयामध्ये सुधारणा होण्याचे दृष्टीने मार्गदर्शन व्हावेत व कोविड चाचणीचे अहवाल लवकर कसे प्राप्त होतील. तसेच अलगीकरण केंद्रातील रुग्णांना पुरेसा औषध पुरवठा होईल याबाबत दक्षता बाळगणे. याबाबत संबंधीत प्रशासकीय विभागाला सुचना निर्गमीत कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, विद्यार्थी उपाध्यक्ष अमोल मुळे, विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस अमोल गाभणे, दिलीप कव्हर, आबा सोनटक्के, मैयन्नोद्दीन काझी, रवी नानकर, गजानन कुटे, प्रशांत अंभोरे, मंगरुळपीर ता. अध्यक्ष लक्ष्मण जाधव, नवनाथ क्षिरसागर, मौहम्मद नौरंगाबादी, सौ. बेबीबाई धुळधुळे, यांच्यासह असंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- मोदी सरकारच्या ‘त्या’ विधेयकांना संघ परिवारातून विरोध; दिला आंदोलनाचा इशारा
- संत्र्याचा कॅलिफोर्निया पिकविणाऱ्यांना वाचावा, कोणी केली ही मागणी
- संग्राम जगताप यांचा भाजपला धक्का; स्थायी समिती सभापती पदाचा भाजपचा उमेदवारच राष्ट्रवादीत
- रुग्णसेवेसाठी बोलावता, सुरक्षेची हमी तर द्या… अभाविपच्या विद्यार्थ्यांचा वैद्यकीय अधीक्षकांना घेराव
- वाशीममध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले हे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
