औरंंगाबाद : कोरोना संसर्गाची भयनाक परिस्थिती निर्माण झालेली असताना आंदोलनाला कुठलीही परवानगी नसताना देखील भाजपा शहर अध्यक्षांसह इतर कार्यकर्तांनी जिल्हा सामन्य रुग्णालय चिकलठाणा येथे आंदोलन केल्या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिकलठाणा येथे उभारण्यात येणा-या ऑक्सिजन प्लँटचे उद्घाटन करण्यात आले होते. हा प्लँट का सुरू केला नाही म्हणून प्रशासनाच्या विरुद्ध जिल्हा सामन्य रुग्णालयासमोर गर्दी जमवून भाजपाचे शहर अध्यक्ष संजय केणेकर, बापू घडामोडे, राजू शिंदे, शेख हाफीज, वर्षा सोळूंके यांनी आंदोलन केले होते.
राज्यात संचारबंदी असताना अशा प्रकारे नियम झुगारून आंदोलन करून कोरोन संसर्गाचा धोका वाढविल्या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे जमादार अशोक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- बॉलीवूडमध्ये टिकणे झाले अवघड, कंगनाच्या हातातून निसटले अनेक ‘एंडोर्समेंट’
- महागाईचा निषेध करत पुण्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसने घातले गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध
- जालन्यातील तरुणीचा लग्नाच्या नावाखाली मालेगावच्या तरुणाला पाच लाखांचा गंडा
- UPSC ची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर; आयोगाने नवी तारीखही केली जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

