🕒 1 min read
औरंगाबाद : विविध प्रकाराच्या अत्याचाराने पिडीत महिलांच्या तक्रार व निवारण समुपदेशानासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु मुख्य कार्यालयातच अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्तीच झालेली नाही. असे असताना महिला दिनी औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे उद्घाटन पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, हे उद्घाटन म्हणजे फक्त सरकारला दिखाव्याचे ढोल पिटवायचे आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने राज्यातील प्रत्येक विभाग स्तरावर राज्य महिला आयोगाची कार्यालये स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी झाला आहे. त्यानुसार औरंगाबाद विभागीय कार्यालय विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, औरंगाबाद येथे सुरु करण्याचा घाट सरकारने घातला आहे. परंतु मागील एक वर्षापासून मुंबई येथील मुख्य कार्यालयालाच महिला आयोग अध्यक्ष नाही. तर अध्यक्षाविना कार्यालय सुरु करून काय फायदा होणार आहे.
राज्य महिला आयोगाच्या या औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण होण्याच्या दृष्टीने काम केले जाणार आहे. त्यानुसार माहिलांना त्यांच्या इच्छेनुसार तज्ञ समुपदेशकामार्फत समुपदेशन केले जाईल. किंवा स्थानिक पोलीस स्टेशन कडून सहकार्य घेण्यात येईल. अतिमहत्वाच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी किंवा स्वाधिकारे ( सुमोटो ) नोंद घ्यावयाच्या तक्रारींबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येईल. महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयाव्दारे प्रस्तावित,नियोजित सुनावण्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात पोलीस विभागातर्फे महिला तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. विधी सेवा प्राधिकरण मार्फत जिल्हा कोर्टामध्ये तसेच महिला व बालकल्याण विभागामार्फत देखील महिलांसाठी समुपदेशन केंद्र तसेच वकीलामार्फत योग्य ती मदत केली जाते. हे सर्व जर अगोदरच प्रत्येक जिल्ह्यात मिळत आहे. आणि महिला आयोगाच्या समिती कडून महिलांना अपेक्षित असलेला न्याय या ठिकाणी मिळणार नसेल तर हे विभागीय कार्यालय स्थापन करणे म्हणजे फक्त सरकारी दिखावाच आहे असे मत महिलांमधून व्यक्त केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाला संधी समजून आम्ही पेट्रोल-डिझेलवर कर लावला नाही याचा सार्थ अभिमान’
- धीरज देशमुखजी, मतदारसंघातील प्रश्न सोडवलात, राज्यातील इतर ग्रामपंचायतींचे काय?
- मनसुख हिरेन हे तर पट्टीचे स्वीमर,मग ते तलावात जीवन कसे संपवू शकतात?
- CBSE बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये बदल; घ्या जाणून सुधारित वेळापत्रक!
- वाझेंच्या तपासावर फडणवीसांचा आक्षेप; देशमुख म्हणाले, हा अर्णबला आत टाकल्याचा राग !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
