Share

ना. धों. महानोर करणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या साहित्यप्रतिभेने गेल्या पन्नास वर्षांपासून रसिकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ कवी, पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी ही माहिती दिली.

१०, ११, १२जानेवारी २०२० ला हे संमेलन होत आहे. संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झाली आहे. आयोजक असलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेततर्फे जय्यत तयारी सुरू असून संमेलन संस्मरणीय होण्यासाठी आखणी सुरू आहे. संमेलनाची रूपरेषा निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहे, असे तावडे यांनी सांगितले.

संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना निमंत्रण देण्यात आले होते. उस्मानाबादकरांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी येण्याचे मान्य केले आहे. महानोर यांच्या लेखणीतून साकारलेली ‘अजिंठा’, ‘कापूस खोडवा’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’, ‘जगाला प्रेम अर्पावे’, ‘त्या आठवणींचा झोका’, ‘दिवेलागणीची वेळ’, ‘पळसखेडची गाणी’, ‘पक्ष्यांचे लक्ष थवे’, ‘पानझड’, ‘पावसाळी कविता’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘रानातल्या कविता’, ‘शरद पवार आणि मी’, ‘शेती’, ‘आत्मनाश’ व ‘संजीवन’ आदी पुस्तके वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. ‘जैत रे जैत’, ‘सर्जा’, ‘एक होता विदूषक’, ‘अबोली’, ‘मुक्ता’ आदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. महानोर यांना १९९१मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्या ‘पानझड’ या पुस्तकास २०००मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे २००९मध्ये त्यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संमेलनात तीन दिवस चालणार्या विचारमंथनातून साहित्यप्रतिभेला नवी दिशा निश्चित मिळू शकणार आहे. संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ना. धों. महानोंर यांच्या निवडीचे आयोजक मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य तसेच मराठवाड्यातील साहित्यिक, विविध संस्था, संघटनांनी स्वागत केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1205744474661376003?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1205748230085955585?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!