🕒 1 min read
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संघटनांचा विरोधामुळे वादग्रस्त ठरल्याने नव्या जागेत छत्रपतींचा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा वनस्पती उद्यानाच्या जागेत न बसवता प्रशासकीय इमारतीसमोरील लंच होमच्या बाजूला असणार्या मोकळ्या जागेत बसवण्याचा निर्णय विद्यापीठाच्या पुतळा समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या उद्यानात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अश्वारुढ पुतळ्याच्या चबुतर्यासह इतर सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आली होती. यावरुन वेगवेगळ्या संघटनांचा विरोध सुरु झाला. मुप्टा शिक्षक संघटना, रिपाइं युवक आघाडी यांनी वनस्पतीशास्त्र विभागातील जैवविविधता, दोन्ही महापुरुषांची तोंडे विरुद्ध दिशेला असल्याच्या मुद्द्यावरुन प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळे अखेर प्रशासनाने जागा बदलण्याचा निर्णय घेतला.
विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा प्रस्ताव माजी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या काळात मंजूर करण्यात आला होता. मात्र, अंतर्गत विरोध आणि प्रशासकीय दिरंगाईत २०१७ पासून या पूर्वनियोजित प्रकल्पाचे काम मागे पडले होते. व्यवस्थापन परिषदेत प्रस्ताव घेतल्यानंतर संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली.
या सहा सदस्यांच्या समितीने तात्काळ प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर पुतळा निर्मितीची निविदा काढण्यात आली. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र उद्यानात पुतळा उभारणीसाठी चबुतरा निर्मितीच्या कामाला छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली होती. या कामाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने भूमिपूजन पार पडले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- या मोदी सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक!
- देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं ; अशोक चव्हाणांचा टोला
- लॉकडाऊननंतर औरंगाबादच्या ‘स्मार्ट’ बसने मारला पुन्हा स्टार्टअप
- औरंगाबादसह हिंगोली मधील म्हाडाच्या सदनिकांची गुरूवारी ऑनलाईन सोडत
- ‘फक्त मराठा आरक्षणच नाही तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही केंद्राने प्रयत्न करावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
