मुंबई : काही दिवसापुर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यात महिला क्रिकेट संघासोबत नवनिर्वाचीत प्रशिश्रक रमेश पोवार हे असणार आहे. यापुर्वी रमेश पोवारने २०१८ साली भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा संभाळली होती. आता ते पुन्हा एकदा प्रशिक्षक पद भुषवत आहे.
मात्र भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा इतिहासावर नजर टाकली तर असे दिसुन येते की, गेल्या दहा वर्षापासून प्रत्येक वर्षी महिला क्रिकेट संघाला नविन प्रशिक्षक लाभले आहे. २०१० साली महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी केव्हीपी राव यांची , २०११-१३ साली अंजु जैन, २०१३ साली तुषार आरोटे तर पुर्णिमा राव यांची २०१४ साली निवड झाली होती. यानंतर २०१४ मध्येच सुधा शाह यांना प्रशिक्षकपद देण्यात आले. यानंतर पुर्णिमा राव यांनी पुन्हा २०१५-१७ दरम्यान प्रशिक्षक पद भूषवले. तर तुषार आरोटे यांनाही पुन्हा संधी देत २०१७-१८ यादरम्यान प्रशिक्षक पद देण्यात आले.
यानंतर २०१८ साली रमेश पोवार यांनी प्रशिक्षणपदाची धुरा संभाळली होती. त्यांच्यानंतर डब्लू. व्हि. रमण यांना २०१९-२१ यादरम्यान संधी देण्यात आली. आता इंग्लंड दौऱ्यासाठी रमण यांना हटवत पुन्हा रमेश पोवार यांना प्रशिक्षणपद देण्यात आले. गेल्या ११ वर्षात बीसीसीआयने तब्बल तीन प्रशिक्षकांना दुसऱ्यांदा संधी दिली. आणि सरासरीनुसार एका वर्षाला एक प्रशिक्षक लाभला आहे. मात्र पुरुष क्रिकेट संघात एकाही प्रशिक्षकाला दुसरी संधी देण्यात आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंडला जोरदार झटका ; जोफ्रा आर्चर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
- तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा,अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणची कसरत
- आयपीएल २०२२ मधील २ नविन संघाचा समावेशावर प्रश्नचिन्ह; ‘हे’ कारण आले समोर
- ‘स्वदेस तो लौट गये लेकिन…’, मायदेशी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूपुढे ‘ही’ अडचण
- ‘करोना प्यार है…’ ; करोना पॉझिटिव्ह पतीसोबत शिल्पा शेट्टीने शेअर केला रोमँटिक फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

