🕒 1 min read
गोवा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) प्रचार करण्यासाठी गोव्यात पोहोचले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज(१२ फेब्रु.)आदित्य ठाकरे यांनी पणजीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. तसेच मागील ५ वर्षांमध्ये आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला, असेही आदित्य म्हणाले.
यावेळी बोलत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले की,‘आमची जेव्हा भाजपसोबत युती होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची ही भावना होती की मित्रपक्ष असेल, तर मैत्री स्वच्छपणे पुढे न्यायला हवी. कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यात लढायचो नाही. परंतु मागील ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. हेच एनडीएतील इतर पक्षांसोबतही झाले’, असे आदित्य म्हणाले.
दरम्यान, पुढे उत्पल पर्रीकर यांच्या संदर्भात विचारण्यात आले असता आदित्य म्हणाले की‘शिवसेनेने जितकी मैत्री जपायची होती, ती खुलेपणाने जपली आहे.’ तसेच आम्ही उत्पल पर्रीकरांना देखील साफ आणि स्वच्छ मनाने पाठिंबा दिला आहे, असेही आदित्य यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 Auction:”धोनी स्वतःच निवडतो टीम, तुम्ही निराश नाही होणार” CSK च्या सीईओचे फॅन्सला आश्वासन
- IPL 2022 AUCTION: IPL 2022 AUCTION : अर्रर्र..! ज्या संघासोबत झाला वाद, आता त्याच संघाचा अश्विन झाला भाग!
- suspension of 12 mla revoked : “महाविकास आघाडीच्या अहंकाराचे वस्त्रहरण”, आशिष शेलारांचे टीकास्त्र
- IPL 2022 Auction : चेन्नईचा फाफ डुप्लेसिस खेळणार बंगलोर कडून; मागील वर्षी ठरला होता सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू
- IPL Auction 2022 : श्रेया मोठा गेम झाला यार..! RCB म्हणता म्हणता अय्यर गेला ‘या’ संघात; मिळाले १२.२५ कोटी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
