Share

Karnataka Election; देशात लोकशाहीचा पराभव – राहुल गांधी

Published On: 

नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान यावरून राहुल गांधी यांनी मात्र भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपा कर्नाटकमध्ये त्यांच्या विजयाचा जल्लोष करत आहे. पण दुसरीकडे देशभरात लोकशाहीच्या पराभवावर शोक व्यक्त केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसतानाही त्यांनी हा घाट घातला. ही संविधानाची थट्टाच आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!