महाराष्ट्र देशा टीम : कोव्हीड-१९ संसर्ग प्राण्यांनाही होऊ शकतो हे माहित असतांनाही काही शहरातील गुरा-ढोरांचे पालन करणारे बेजबाबदारपणे गुराढोरांना नेहमी प्रमाणे रस्त्यावर सोडून देत आहे. हे गुर-ढोरं रस्त्यावर झुंड करून फिरतांना दिसत असून. पोट भरण्यासाठी या प्राण्यांना देखील वन-वन करावी लागत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली असतांना गोपालकांनी या प्राण्यांच्या खाण्याची सोयही घरातच करणे गरजेचे आहे. मात्र अनेक गोपालक असं करतांना दिसत नाहीत. शहरात अनेक ठिकाणी हे प्राणी फिरताना दिसत आहे. त्यामुळे या प्राण्यांसह शहरवासीयांच्या देखील जीवाला धोका आहे. व तसेच या प्राण्यांना हाकून लावण्याचा ताण पोलिसांना देखील होत आहे.
दरम्यान, रस्त्यावर अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या या प्राण्यांना काही समाजसेवक अन्नदान करतांना दिसून आले. त्यामुळे काहीवेळ का होईना हे प्राणी एका ठिकाणी बसत आहे. परंतु असे असले तरी गोपालकांनी प्राण्यांना बाहेर सोडू नाही अशी मागणी सुरक्षा यंत्रणे कडून केली जात आहे. तसेच भटके जनावर देखील शहरात आहे व या भटक्या जनावराची भुके मुळे वन-वन होत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्ते बंद केल्यामुळे या भटक्या जनावरांना कोणी खायला घालत नसल्याने या जनावरांचे हाल होत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

